झेप वार्ता न्यूज
💔 काल वाढदिवसाचा आनंद… आज कायमची एक्झिट!
🔴 कर्तव्यावर निघाले, पण पोलीस ठाण्यात पोहोचलेच नाहीत; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू!
काल संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला… सहकाऱ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवले… पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते!
मुंबईतील कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचा कर्तव्यावर जात असताना दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईतील उलवे येथून कामावर निघालेल्या गायकवाड यांना प्रवासादरम्यान अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी गाडीतच थोडा आराम करण्यासाठी उशी मागितली… मात्र, त्यानंतर त्यांची झोप कायमची ठरली!
पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर चालकाने आवाज दिला, तरीही ते उठले नाहीत. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
💔 अवघ्या सात महिन्यांपूर्वी पदोन्नती… डोळ्यांत भविष्याची स्वप्ने… आणि अचानक आयुष्याचा प्रवास संपला!
याच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. एकाच महिन्यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
या घटनांनंतर पोलीस दलातील वाढता कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव, अपुऱ्या विश्रांतीचा प्रश्न आणि अधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या मृत्यूंमागे कामाचा ताणच कारणीभूत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🚨 कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण कोण करणार?
जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस धावणारे पोलीस अधिकारी… स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून कर्तव्य बजावणारे खाकी वर्दीतील हात… त्यांच्या आरोग्याची, विश्रांतीची आणि मानसिक तणावाची जबाबदारी कोण घेणार?
खाकी वर्दीच्या आतही एक माणूस असतो… त्यालाही थकवा असतो, वेदना असतात, कुटुंब असते आणि जगण्याची स्वप्ने असतात!
🙏 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐
झेप वार्ता न्यूज -मुख्य संपादीका परवीन पानसरे
👍लाईक करा | 🔄 शेअर करा | 🌍फॉलो करा

Post a Comment
0 Comments