![]() |
पुरंदरमध्ये ६ हजार ४९८ रेशनकार्डधारकांना नोटिसा!
‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची होणार पडताळणी; सात दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश
पुरंदर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांची पात्रता तपासण्यासाठी प्रशासनाकडून ‘मिशन सुधार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पुरंदर तालुक्यातील ६ हजार ४९८ रेशनकार्डधारकांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.
पुरंदर तालुक्यात एकूण २ लाख ३५ हजार ९८१ रेशनकार्डधारक असून, त्यापैकी १ लाख ७८ हजार ११६ खातेदार राष्ट्रीय अन्नधान्य योजनेचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांमधील आयकर विवरणपत्र (ITR) भरणारे, भविष्य निर्वाह निधी (PF) जमा होणारे तसेच उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या खातेदारांची प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे.
या पडताळणी प्रक्रियेत ६ हजार ४९८ खातेदारांना नोटिसा देण्यात आल्या असून, नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह आपला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संबंधित लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत रेशनधान्याचा लाभ सुरू राहणार असल्याचे निरीक्षण अधिकारी गोपाळ ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
अंतिम पडताळणीनंतरच पात्रतेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने नोटीस मिळालेल्या रेशनकार्डधारकांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह खुलासा सादर करणे महत्त्वाचे आहे.
झेप वार्ता संपादिका * परवीन पानसरे *

Post a Comment
0 Comments