झेप वार्ता संपादिका *परवीन पानसरे *
सासवडमध्ये 1.758 किलो गांजा जप्त; विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला अंमली पदार्थ, एक आरोपी अटक
सासवड पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ (गांजा) जप्त; एक आरोपी अटक.
सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी सागर बबलु नाथु (वय 21 वर्षे, रा. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्या ताब्यातून विक्रीच्या उद्देशाने घरामध्ये बेकायदेशीररीत्या ठेवलेला एकूण 1.758 किलो ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ, अंदाजे ₹48,000 किंमतीचा जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. 553/2026 अन्वये, गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 मधील कलम 8(क) व 20(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत फिर्यादी पोशि/434 तुषार बाळू लोंढे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपासाचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत करीत आहे.
झेप वार्ता संपादिका -परवीन पानसरे
![]() |

Post a Comment
0 Comments