![]() |
शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी! पुण्यात खळबळ; न्यायालय परिसर तातडीने रिकामा
झेप वार्ता | पुणे प्रतिनिधी
पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी पुण्यात एकच खळबळ उडाली. राज्यातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजीनगर न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. न्यायालयातील पक्षकार, वकील, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले. अचानक राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला असून, सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
राज्यातील अनेक न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल मिळाल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरातील सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले.

Post a Comment
0 Comments