![]() |
झेप वार्ता *संपादिका * - परवीन पानसरे सासवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड.
आरोपी ताब्यात; ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉलीसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
सासवड : थापेवाडी (ता. पुरंदर) येथून चोरीला गेलेला ट्रॅक्टर आणि डंपिंग ट्रॉलीचा शोध घेत सासवड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एकूण १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.�
दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी थापेवाडी येथे सासवड–जेजुरी रस्त्यालगत श्री डेव्हलपर्सच्या ठिकाणी कामासाठी लावलेला ट्रॅक्टर आणि त्याची डंपिंग ट्रॉली रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. याबाबत ओंकार चंद्रकांत कुंजीर (रा. थेऊर, पुणे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.�
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत आणि पोलीस अंमलदारांचे तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी व साक्षीदारांकडून माहिती घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा माग काढला.�
तपासादरम्यान ट्रॅक्टर पुण्यातील चांदणी चौकातून बाणेरच्या दिशेने गेल्याचे समोर आले. त्यानंतर गोपनीय बातमीदारांच्या मदतीने सुतारवाडी येथील स्मशानभूमीजवळील पाण्याच्या टाकीच्या परिसरात ट्रॅक्टर उभा केल्याची व संशयित आरोपी पिरंगुट येथे गेल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिरंगुट येथे जाऊन आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.�
आरोपीकडून ८ लाख ५० हजार रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा अर्जुन ५५५ मॉडेलचा ट्रॅक्टर आणि १ लाख ५० हजार रुपये किमतीची डंपिंग ट्रॉली, असा एकूण १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, गणेश सोनवणे, गोकुळ हिप्परकर तसेच पोलीस अंमलदार तुषार लोखंडे, प्रवीण शेंडें आणि प्रणय मखरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.� झेप वार्ता संपादिका -परवीन पानसरे

Post a Comment
0 Comments