Type Here to Get Search Results !

५० तोळे सोने, २५ लाखांची मागणी! पुण्यात विवाहितेच्या मृत्यूने खळबळ मुलगी झाल्यानंतर छळ वाढल्याचा आरोप; विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी चौघे अडचणीत हुंड्यासाठी विवाहितेचा छळ? पुण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..


 

                                                                                     पुण्यात आणखी एक हुंडाबळी? विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक; तिघांवर गुन्हा दाखल.

                                                                                        पुणे |    झेप वार्ता प्रतिनिधी 

                                                                                             पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या कुटुंबातील सून पायल झांबरे हिच्या आत्महत्येची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पायल झांबरे यांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांचा संताप अनावर!

पुणे : पायल झांबरे यांच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. श्रीरामनगर येथे शोकाकुल वातावरणात पायल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या लेकीला अखेरचा निरोप देताना कुटुंबीय आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

दरम्यान, पायल यांच्या मृत्यूमागे हुंड्यासाठी होणारा छळ कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपांमुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी पायल यांच्या सासरच्या घरावर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर सासरच्या काही मंडळींनी तेथून निघून गेल्याची माहिती समोर आली असून, स्वारगेट पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पायल यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, त्यांना छळाला सामोरे जावे लागत होते का आणि या प्रकरणात कोणाची भूमिका आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. 

झेप वार्ता संपादिका – परवीन पानसरे 

Post a Comment

0 Comments